Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता

विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता 


मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये  सांगली लोकसभा मतदारसंघ  शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्षाकडे गेला. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळं काँग्रेसमधून  लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या विशाल पाटील  यांनी वेगळा निर्णय घेतला. काँग्रेसला ही जागा न सुटल्यानं विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज जाहीर करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. आता सांगलीची लढत तिरंगी होत आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतल्यानं काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

विशाल पाटील हे सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते असून प्रदेश उपाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. यामुळं विशाल पाटील यांोनी उमेदवारी अर्ज मागं घ्यावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेतृत्त्वाला विशाल पाटील यांची समजूत काढण्यात अपयश आलं. त्यामुळं उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

सांगलीत तिरंगी लढत

सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे. सांगली लोकसभेची निवडणूक विशाल पाटील यांनी 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती. मात्र, त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. संजयकाका पाटील, गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील अशी लढत त्यावेळी झाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.