Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लावली, मतदाराने पण उलट थप्पड लावली, व्हिडिओ व्हायरल

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लावली, मतदाराने पण उलट थप्पड लावली, व्हिडिओ व्हायरल 

हैदराबाद : देशातील निवडणुकाच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान  होत असून सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे 20 टक्क्यांपर्यंत मतदानाचा आकडा पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान होत असून बीड, शिरुर, पुणे, अहमदनगर मतदारसंघात हायव्होल्टेज लढती आहेत.


त्यातच, शिरुर आणि अहमदनगर मतदारसंघात सकाळपासूनच आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. नगरच्या पारनेर मतदारसंघात रस्त्यावरच नोटांचे बंडल पडल्याने चांगलाच गदारोळ झाला. तर, शिरुर मतदारसंघात मतदान केद्रावर मनमानी होत असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशात चक्क आमदारानेच मतदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना उघडकीस आली आहे.

आंध्र प्रदेशमधील 25 लोकसभा मतदारसंघापैकी आज चौथ्या टप्प्यात एकाचवेळी 15 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामुळे, प्रशासन आणि कार्यकर्तेही कामाला लागेल आहेत. तर, मतदान केंद्रांवर मतदारांचाही उत्साह दिसून येत आहे. मात्र, आंध्र प्रदेशच्या तेनाली मतदारसंघाचे आमदार ए. सिवा कुमार यांनी चक्क मतदाराला कानशिलात लगावल्याने मतदान केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. कारण, मतदाराने आमदाराल रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी हटकलं असता आमदाराचा राग अनावर झाला. त्यामुळे, आमदार महाशयाने चक्क रांगेत उभे असलेल्या मतदाराच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, आमदाराच्या कार्यकर्त्यांनीही मतदाराला मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे.

आयएसआसीपी पक्षाचे आमदार शिव कुमार यांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी एंट्री केली. त्यावेळी, रांगेतील मतदाराने त्यांना रांगेत उभे राहून मतदान करण्याचे सूचवले. त्यामुळे, संतप्त आमदाराने मतदारालाच थप्पड लगावली. त्यानंतर, संतापलेल्या मतदारानेही आमदाराच्या कानाखाली जाळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निवडणुकीत आपला पराभव दिसत असल्यानेच वायएसआरसीपी पक्षाचे नेते हिंसा आणि मारहाणीच्या घटना करत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ घटना वगळता आत्तापर्यंत शांततेत मतदान पार पडले असून सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 18.81 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, येथील 175 विधानसभा मतदारसंघासाठीही आज मतदान होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.