झाकीर नाईकनें पुन्हा विष कालावले :, ' मंदिरात जाण्यापेक्षा दहशतवाद्यसाठी शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जांण चांगले
इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. झाकीर नाईक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते म्हणाले,दहशतवाद्यांनी मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले आहे. ते पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांनी मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात जाणे चांगले आहे. अशी धार्मिक स्थळे बांधणे हे सर्वात मोठे पाप असून त्यांच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणेही चुकीचे आहे.
झाकीर नाईकच्या या कमेंट्स काही काळापूर्वी मोहम्मद झीशान नावाच्या तरुणाने त्याला संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये एका मंदिर निर्माण कंपनीत नोकरी मिळवण्याबाबत विचारल्यावर आल्या आहेत. अशात तो मुस्लीम असल्यामुळे त्याने हे काम करावे की नाही? असाही प्रश्न त्याने विचारला यावर बोलतांना झाकीर नाईने वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे. त्यांच्या या विधानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कोण आहे झाकीर नाईक?
झाकीर नाईक हा मूळ भारतीय आहे. मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेले वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक सध्या 65 वर्षांचे आहेत. सध्या तो मलेशियामध्ये राहतो. भारतातील विविध खटल्यांमध्ये तो आरोपी आहे. 2016 मध्ये त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) या संस्थेवर भारतात बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही तर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) झाकीर नाईकविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हाही दाखल केला होता. त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगशी संबंधित आरोपांचाही सामना केला आहे. या प्रकरणानंतर त्यांनी भारत सोडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.