माउंट एव्हरेस्टचं शिखर सर करणं हे आज देखील एक मोठं आव्हान आहे. अशातच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्राचे नाव मोठं केलं. तसेच एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत.
पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी 2022 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. पण हायर अल्टीट्युड पल्मनरी एडेमाचा त्रास झाल्यानं त्यांना परत फिरावं लागलं होतं. पण ‘कोशीश करने वालोंकी हार नही होती’ या पक्तींना प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय करून दीड वर्ष त्यांनी स्वत:वर प्रचंड परिश्रम घेतले. 2024 मध्ये पुन्हा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निश्चय केला. दोन महिन्यांच्या प्रवासानंतर 22 मे 2024 रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.