वृत्तपत्रीय संस्कार घरातूनच झाल्याने माझे बहुतांश आयुष्य पत्रकारितेत गेले त्यातून माझ्या संवादाच्या आणि संपर्काच्या कक्षा रूंदावत गेल्या पत्रकारितेत उपेक्षिताना न्याय देण्याचा संघर्ष सातत्याने केला समाजात अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. कोल्हापूर-पुणे-मुंबई-दिल्ली अशी शिखरे पादाक्रान्त केली राष्ट्रपती-पंतप्रधानपासून विविध उच्च पदस्थ व्यक्तींचा सहवास-स्नेह-जिव्हाळा लाभला.
यशस्वी निवृत्तीनंतर कोरभर भाकरीचा चंद्र उशाशी घेऊन परमेश्वरचरणी लीन होऊन मी सुखासमाधानाने जगत आहे. आजकाल अनेक मुले आयटी क्षेत्रात धवल यश मिळवून जग आपल्या मुठीत घेऊन जगत आहेत साहजिकच त्यांच्या पालकाना परदेशगमनाचे योग आपसूकच लाभत आहेत. आमचा घाकटा मुलगा ओरॅकल फायनान्समध्ये निपुण झाला मलेशिया,कतार,सौदीपासून लंडन-अमेरिका असे जगभर भ्रमण करत शेवटी कॅलीफोर्नियाला स्थिरावला दरम्यान आम्हाआईवडीलाना मक्का-मदीना या तिर्थक्षेत्री उमरा दर्शन घडविले,लंडन पर्यटनाचा आनंद घडविला आता महिनाअखेरीस तो आम्हाला कॅलीफोर्नियाला नेत आहे. पत्रकार बैठकामध्ये कोकणचा कॅलीफोर्निया करणार या राजकारण्यांच्या भुरळ घालणा-या घोषणापूरता आमचा संबंध आता प्रत्यक्षात आजमावता येणार आहे. परमेश्वराच्या असीम कृपेने आणि आपल्या स्नेह्यांच्या शुभेच्छामुळे हा योग लाभत आहे सर्वांचे मनःपूर्वक आभार !
- नाना पालकर,ज्येष्ठपत्रकार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.