सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा अन्यथा भ्रष्टाचार प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स रकारला दिला आहे. शेट्टी यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारकडे नुकतेच पाठविले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा शाखांमध्ये दोन कोटी 43 लाखांचा दुष्काळ आणि अवकाळी निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा समोर आला. या घोटाळाप्रकरणी बँकेने सात जणांना निलंबित केले आहे. तसेच बॅंकेने विविध शाखांची तपासणी देखील केली.
या प्रकरणानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेट्टी यांनी बँकेवर प्रशासक नेमावा, बँकेची सखोल चौकशी व्हावी याबाबतच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.