तुम्ही मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युजर्सना WhatsApp चा चांगला अनुभव देण्यासाठी मेटा नवीन अपडेट आणत असते. मेटा मालकीची कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. जे युजर्सना कॅमेरामध्ये अपडेट देणार आहे. हे फीचर कॅमेरामध्ये झूम कंट्रोलचा पर्याय देते. याशिवाय कंपनी कॅमेरा रोलसह स्टिकर्स तयार करण्याच्या सुविधेवरही काम करत आहे. युजर्स स्टिकर्स तयार करण्यासाठी मेटा एआयचा वापर करु शकतात.
फोटो आणि व्हिडिओमध्ये झूम कंट्रोल करु शकता
फीचर ट्रॅकर WABetaInfo ने दोन्ही नवीन फीचर्सची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, iOS 24.9.10.75 साठी WhatsApp बीटा वर नवीन झूम कंट्रोल फीचर दिसले आहे. ज्या युजर्सनी TestFlight द्वारे iOS साठी WhatsApp चे बीटा व्हर्जन प्राप्त करण्यासाठी साइन अप केले आहे ते आता नवीन कॅमेरा झूम कंट्रोल फंक्शन वारण्यासाठी लेटेस्ट व्हर्जन मध्ये अपडेट करु शकता. हे व्हर्जन त्यांना फोटो क्लिक करताना किंवा WhatsApp वर व्हिडीओ रेकॉर्ड करताना झूमचा पर्याय देते.
आता मिळते ही सुविधा
व्हॉट्सॲप सध्या युजर्सना ॲपमधील कॅमेऱ्यावर व्ह्यूफाइंडरच्या बाहेर आणि आतमध्ये पिंच करणे किंवा कॅप्चर बटण दाबून धरून वर स्वाइप करण्याचा पर्याय देते. हे दोन्ही पर्याय झूम बटणासारखे सोपे नाहीत. झूम कंट्रोल फीचरमुळे यूजर्सना कॅमेराचा एक्सपिरिएन्स अधिक चांगला होणार आहे.
कॅमेऱ्याने स्टिकर्स बनवू शकता
WABetaInfo नुसार, मेटा मालकीच्या मेसेजिंग सर्व्हिसने iOS 24.9.10.74 अपडेटसाठी WhatsApp बीटासह बीटा चाचणीसाठी आणखी एक फीचर आणले आहे. बीटा टेस्टर्सना सध्या WhatsApp वर स्टिकरची निवड करण्यासाठीच्या पॅनेलसह AI शॉर्टकट तयार करण्याची आणि वापरण्याची सुविधा मिळत आहे. हे लवकरच सर्व युजर्ससाठी रिलीज केले जाऊ शकते.WhatsApp लवकरच एक इन ॲप डायलर फीचर आणत आहे, जे युजर्सना थेट व्हॉईस कॉल करण्याची सुविधा देईल. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याच्या मदतीने नंबर सेव्ह न करताही व्हॉईस कॉलिंग करता येते. हे सामान्य डायलरप्रमाणे काम करेल, जसे आपण सामान्य कॉल करतो. हे फीचर लवकरच आणले जाऊ शकते.
अकाऊंट रिस्ट्रिक्शन फीचर
व्हॉट्सअप एका नव्या फीचरवर काम करत आहे. या फीचरचे नाव अकाऊंट रिस्ट्रिक्शन फीचर असे आहे. जर तुम्ही व्हॉट्सअप पॉलिसीचं उल्लंघन केलं तर कंपनी तुमचं अकाऊंट ब्लॉक करेल. व्हॉट्सअपच्या युजर्ससाठी काही गाईडलाईन्स आहेत आणि त्याचं पालन करणे गरजेचे आहे. जे युजर्स गाईडलाईन्स पाळणार नाहीत म्हणजेच व्हॉट्सअपच्या नियम मोडतील त्यांचे अकाऊंट ब्लॉक होईल आणि तुम्ही चॅटिंग करु शकणार नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.