सांगली लोकसभेत मिरज पॅटर्नचीचं चर्चा :, पक्षीय पाश झुगारून सर्व पक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटीलांचा प्रचार
सांगली: लोकसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असणाऱ्या सांगली मतदारसंघात मतदान जसजसे जवळ येत आहे, तसतसे एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सांगलीच्या राजकारणात सध्या अस्तित्त्वात आलेल्या मिरज पॅटर्नची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
कारण, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी सांगलीतील सर्वपक्षीय नगरसेवक एकटवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नगरसेवकांनी विशाल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. हे पाऊल उचलताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षीय पाश झुगारुन टाकले आहेत.भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या या मिरज पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक असणारे नगरसेवकही या पॅटर्नमध्ये सहभागी झाले आहेत. भाजप पक्षाच्याही अनेक नगरसेवकांनी ही संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत. पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याची ठाम भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आता भाजप, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, ही जागा काँग्रेसची असल्याचे सांगत विशाल पाटील यांनी याठिकाणी शड्डू ठोकला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी मनधरणी करुनही विशाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माघार घेतली नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता सांगलीत विशाल पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये विशाल पाटील यांना मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे.
कोणत्या नगरसेवकांचा विशाल पाटलांना पाठिंबा?
* मैन्युदीन बागवान- राष्ट्रवादी, शरद पवार गट, माजी महापौर* अझम काझी- राष्ट्रवादी* चंद्रकांत हुळवान- राष्ट्रवादी* नरगीस सय्यद- राष्ट्रवादीशिवाजी दुर्वे- भाजप* आनंदा देवमाने- भाजपा* निरंजन औटी- भाजप* संदीप औटी- भाजप* संजय मेंढे- काँग्रेस* बबीता मेंढे- काँग्रेस* करन जामदार- काँग्रेस* वहिदा नायकवाडी- काँग्रेस
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.