वैद्यकशास्रानुसार, शरीरात घडणारा असामान्य बदल हा दीर्घकाळ राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हात कंप पावणे या समस्येसही हे तत्त्व लागू होते. अशक्तपणामुळे हातांची थरथर किंवा कंप होते असे मानले जाते. मात्र, नेहमीच अशक्तपणा हे कारण नाही. त्याची इतरही काही कारणे आहेत. हात कापण्याची काही कारणे जाणून घेऊया.
रक्तदाबाचे कारण
रक्तदाबामुळे हात, पाय कंप पावणे हे सामान्य लक्षण आहे. रक्तदाब वाढते किंवा कमी होणे यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे हातांचा कंप होतो. त्याशिवाय शरीरातील साखरेची पातळी कमी होते आणि ताण वाढू लागतो. त्यामुळे हाताची थरथर होण्याचा त्रास सुरू होतो.
साखर
ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यामध्येही हात थरथरण्याचे लक्षण पाहायला मिळते. कारण, शरीरातील साखर कमी झाल्याने व्यक्तीला होणारा ताण वाढतो त्यामुळे हात थरथरू लागतात. हात कंप पावत असतील आणि मधुमेह नसेल तर एकदा साखरेचे प्रमाण तपासून घ्यावे.
अॅनिमिया
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांना अॅनिमिया झाला आहे असे म्हणतात. त्यातही हात कंप पावणे हे लक्षण दिसून येते. अॅनिमियाच्या रुग्णांना अशक्तपणा येतो त्यामुळे हात कंप पावतात.
कॉर्टिसोल हार्मोन
शरीरात कॉर्टिसोल हार्मोन्स वाढल्यामुळे तणावाची पातळी वाढते. त्याचबरोबर व्यक्तीची चिडचिड होणे, गोष्टी विसरणे आणि हाताला कंप सुटणे आदी त्रास होतात. त्यामुळे रक्ताभिसरण बिघडते आणि हात कंप पावतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.