Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीचीं उचल बांगडी केलीये???

भाजपाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीचीं उचल बांगडी केलीये???


४ जून….. भाजपला बहुमत मिळेल. कदाचित 400 प्लसचा आकडाही पूर्ण होईल. पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल. या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे. मोदी मॅजिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्षे पूर्ण केलेली असताना 2024 ला मात्र हाच चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय की काय? असा प्रश्न यामुळे तयार झालाय. भाजपचं इंटरनल पॉलिटिक्स काही का असेना, पण खरंच मोदी पंतप्रधान नसतील तर त्यांना रिप्लेस करेल असा पंतप्रधानपदाचा भाजपातील चेहरा कोण असेल? 4 जून नंतर भाजपमधील कुठला नेता आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर दिसेल? आणि या सगळ्याची नेमकी राजकीय कारण काय असतील? तेच पाहुयात,

अबकी बार मोदी सरकार… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत पंतप्रधानपदावर विराजमान झाले. 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म त्यांनी बहुमताच्या गाजवल्या. 2024 ला जेव्हा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हाच अबकी बार 400 पार असं म्हणत भाजपने पुन्हा एकदा आपण आरामात जिंकून येऊ असा मेसेज दिला. पाचव्या टप्प्यालाच आपण बहुमताचा आकडा गाठला आहे, असं म्हणत अमित शहांनी जणू सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार यावर जणू शिक्कामोर्तब केलाय… त्यामुळे असं धरून चालू की 4 जूनला भाजप देशात पुन्हा एकदा सत्तेत आलीय. मात्र यावेळेस पंतप्रधान पदाचा चेहरा हा बदललेला असेल…
भाजपने मागील दहा वर्ष मोदींच्या चेहऱ्यावर राजकारण केलं. मोदींच्या नावाने मत मागितली. 2019 ची निवडणूक तर मोदी लाटेवरच भाजपाला जिंकता आली. पण 2024 पर्यंत सगळी गणित उलटी झालीयेत. मोदी फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत चालताना दिसला नाही. याउलट मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रागाची भावना असल्याचं एकूणच देशात चित्र होतं. मणिपूर, शेतकरी आंदोलन, महागाई, स्वायत्त यंत्रणांचा चुकीचा वापर या सगळ्यांचं खापर मोदींवर फुटताना दिसलं. यामुळे भाजपने तयार केलेल्या मोदी नावाच्या ब्रँडला आता लोकं कंटाळलेली आहेत, असं चित्र संपूर्ण लोकसभेच्या प्रक्रियेत दिसून आलं. हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजपला देशात लॉन्ग टर्मचं राजकारण खेळायचं असेल तर भाजप पंतप्रधान पदासाठी खांदेपालट करू शकतो. मोदींना रिप्लेसमेंट असणाऱ्या या पंतप्रधान पदांच्या चेहऱ्यांची आता भाजपमध्ये मोठी चर्चा देखील आहे.

मोदींची जागा घेऊ शकतील, असे पंतप्रधान पदाचे पहिले दावेदार आहेत अमित शाह.
मोदी जरी चेहरा असतील तरी पक्षाची संपूर्ण यंत्रणा आणि रिमोट कंट्रोल हा अमित शहांच्या हातात असतो. शहांचा शब्द हा अंतिम शब्द असल्याने त्यांच्यापुढे कुणाचं काही चालत नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा गृहमंत्री होते.. तेव्हापासून ते आता देशाचे गृहमंत्री पदाचा कारभार संभाळताना सरकारचे सगळे महत्वाचे निर्णय हे अमित शहांच्या नेतृत्वाखालीच घेतले जातात. आधी गुजरात मध्ये आणि आता देशाच्या राजकारणात सक्रिय सहभाग असल्यानं देश कसा चालवायचा? हे शहांना पक्कं ठावूक आहे. आत्ताही अनेक महत्त्वाच्या संवेदनशील विषयांवर सरकारची भूमिका शहाच मांडत असतात. त्यामुळे मोदींना रिप्लेस करण शहांसाठी फारशी जड गोष्ट ठरणार नाही. पंतप्रधान मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, संसदेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत नाहीत. यावरून भाजपवर नेहमीच हल्लाबोल होत आलाय. अशात अमित शहा जर पंतप्रधान झाले तर ते आपल्या आक्रमक राजकारणामुळे सरकारची बाजू खंबीरपणे जनतेसमोर मांडत विरोधकांना डॅमेज करू शकतात. भाजपच्या सत्तेच्या खेळाचे चाणक्य म्हणून अमित शहांची ओळख आहे हे तर आपल्याला माहित आहेच. पण पंतप्रधान म्हणून भारतीय जनता त्यांना कशी स्वीकारेल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरू शकतं.

पंतप्रधान पदासाठी या यादीतलं दुसरं नाव येतं ते योगी आदित्यनाथ यांचं.

भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक दिग्गजांना साईडलाईन करत पक्षाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास टाकला.हिंदू धार्मिक क्षेत्रात नाव असणाऱ्या या चेहऱ्याला राजकारणात आणून भाजपने मोठा डाव टाकला. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यापासूनच त्यांनी आपलं सरकार हे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करेल, याची पुरेपूर काळजी घेतली. अनेक कायदे संमत करून, शहरांची नावे बदलून त्यांनी हिंदू जनमानसात स्वतःची अशी एक छबी तयार केली. याच धार्मिक ध्रुवीकरणामुळे भाजपाला याचा मोठा फायदा झाला. हीच मेख ओळखून यंदाच्या लोकसभेच्या प्रचारातही धार्मिक ध्रुवीकरणावर मोदी शहांनी भर दिला. पण त्यांना जनतेने म्हणावा असा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे येत्या काळात हा आपला कट्टर धार्मिक वोटर कायम आपल्या सोबत जोडून घ्यायचा असेल तर यापुढे कडव्या धार्मिक ध्रुवीकरणाचा पर्याय भाजप समोर उरतो. मग यासाठी एकच नाव डोळ्यासमोर येतं ते योगी आदित्यनाथ. पब्लिक मध्ये केलेल्या वक्तव्यांपासून ते विधानसभेत पास केलेल्या कायद्यापर्यंत योगी कसलाही संकोच मनात न ठेवता कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. यामुळे गाय पट्ट्यातून त्यांच्या नावाची मोठी क्रेझ आहे. 2021 पर्यंत काही प्रमाणात थंडं पडलेलं भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला पुन्हा जिवंत ठेवायचं असेल तर मोदींना साईडलाइन करून योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करण्याचे त्यामुळेच भाजपकडून चान्सेस वाढलेत…

तिसरं नाव येतं ते नितीन गडकरी यांचं
गडकरी हे भाजपच्या वर्तुळातील मोठं नाव. मोदींची सत्ता आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक ज्यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव करतात, असं नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी. गडकरींचं विकासांचं राजकारण बरंच काही बोलून जातं. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध गडकरींना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. त्यामुळे मोदींना पर्याय म्हणून जेव्हा पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याचा विचार केला जातो तेव्हा नितीन गडकरी यांच्या नावाला सर्वात जास्त प्राधान्य मिळू शकतं. गडकरी हे संघाच्या अतिशय जवळचे मानले जात असल्यामुळेच मोदी आणि शहांकडून त्यांचं नेहमी अवमूल्यन करण्यात आलं असा आरोप नेहमी होत असतो. संघाला भाजपवरचा कंट्रोल वाढवायचाय, अशाही चर्चा मागील काही दिवसात पेटल्या होत्या. संघ आणि मोदी शहा यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अशावेळेस सत्तेचा समतोल साधत संघालाही सोबत घेऊन राजकारण करण्याचा करिष्मा केवळ नितीन गडकरीच करू शकतात. हे पक्कं ठावूक असल्यामुळे मोदी आणि शहा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने नागपुरातून गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून झाला. आता या आरोपात किती तथ्य आहे. हा नंतरचा मुद्दा. पण यातून 4 जूननंतर नितीन गडकरी मोदींच्या ऐवजी भारताचे पंतप्रधान झाले. तर आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको…

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.