Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का भाजपानें कापलं तिकीट :, मुलाला दिली उमेदवारी

ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का भाजपानें कापलं तिकीट :, मुलाला दिली उमेदवारी 


भाजपकडून  उत्तर प्रदेशच्या  दोन प्रमुख मतदार संघातील उमेदवाराची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह  यांना मोठा धक्का बसला आहे. कैसरगंज लोकसभा मतदारसंघात भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट करत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हा ब्रिजभूषण यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपने रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून नुकताच उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघ आणि कैसरगंज मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी भाजपने उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. परिपत्रक जारी करत भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून करण भूषण सिंह आणि रायबरेली मतदारसंघात दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिल्याची माहिती सांगितली. उद्या हे दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपने ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय. ब्रिजभूषण यांचा मुलगा करणला भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. करण भूषण सिंह हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. याआधी त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तुपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या सर्व आरोपांनंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

करण भूषण सिंह हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. ते भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्ष राहले आहेत. पण वडिलांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देखील उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. करण भूषण सिंह यांचा जन्म 13 डिसेंबर 1990 रोजी झाला. करण भूषण सिंह यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. डबल ट्रॅप नेमबाजीत ते राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत. करण भूषण यांचे शिक्षण परदेशातून झाले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.