वसई : नियंत्रण कक्षात मदतीसाठी फोन आल्यानंतर घटनास्थळावर गेलेल्या पोलिसावरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना नालासोपारामध्ये उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील साईराम चाळीत रविवारी रात्री पती-पत्नीचे भांडण सुरू होते.
रात्री ९ च्या सुमारास पत्नीने मद्यपी पती अरूण सिंग याला एका गाळ्यात बंद करून ठेवले होते. त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. संतोष भुवन येथे गस्तीवर असणारे बीट मार्शल मच्छिंद्र राठोड हे गस्तीवर होते. त्यांनी गाळ्याचे दार उघडले. मात्र आत असलेल्या सिंग याने स्टीलच्या पाईपने राठोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई मच्छिंद्र राठोड गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात ५ टाके पडले आहेत. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी हल्ला करणार्या अरूण सिंग याला हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी गुन्हे दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.