Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मालेगाव हदरलं :, एमआयएमच्या माजी महापौरांवर अंदाधुंद फायरिंग, गंभीर जखमी

मालेगाव हदरलं :, एमआयएमच्या माजी महापौरांवर  अंदाधुंद फायरिंग, गंभीर जखमी 


मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहे. पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. एमआयएमच्या माजी महापौरांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण असून, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेत त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण असून, पोलिस बंदोबस्ततात मोठी वाढ करण्यात आली आहे. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी मालेगावात गोळीबाराची घटना घडली होती. पेट्रोल पंप लुटण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी पेट्रोल पंपावर गोळीबार केला होता, गोळीबाराच्या घटनेनंतर ते पसार झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.