लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात गावकऱ्यांनी जलसंकटामुळे महत्त्वाची भुमिका घेतली आहे. 7 मे रोजी निवडणूका येत असताना, गावकऱ्यांनी मतदानाचे निषेध केला आहे.
पाणी नाही, मत नाही अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी निषेध केला आहे. गावकऱ्यांनी कर्नाटकच्या सीमेजवळ पाण्याच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत निषेध केला आहे. जो पर्यंत पाण्याच्या समस्या दूर होत नाही तो पर्यंत मतदान करणार नाही, असा नारा गावकऱ्यांनी लावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.