सांगली शहरात आज भव्य रॅली उत्साहात संपन्न झाली सांगलीतील तरुणांनी जल्लोषात या रॅलीत सहभाग घेतला. स्थानिक सांगलीकरांनी या बाईक रॅलीचे जोरदार स्वागत करत सत्कार केला. नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण करत आशिर्वाद दिले. माझ्या या साऱ्या कुटुंबाच्या शुभेच्छा, आशिर्वाद हाच मोठा विजय आहे. आजच्या रॅलीत तरुणांचा जल्लोष शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला.
यावेळी नव्याने मिळालेली अखंड ऊर्जा सामाजिक कार्यात अग्रेसर राहताना उपयोगी पडेल. या रॅलीत सर्वांना अभिवादन केले, त्यांचे प्रेम अनुभवले. रॅलीला लोकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही विजयाची नांदी आहे. येणाऱ्या मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान केंद्रांवरील उजव्या बाजूच्या मशीन वरचे पहिल्या क्रमांकाचे म्हणजे अनुक्रमे १७ नंबरच्या लिफाफा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून देत सेवेची संधी देतील असा विश्वास विशाल पाटील यांनी बोलून दाखवला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.