पोलिसाला चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे बदनामीच; हायकोर्टाचा प्रोसेस रद्द करण्यास नकार
चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे पोलिसाची बदनामी करण्यासारखेच आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीविरोधातील प्रोसेस रद्द करण्यास नकार दिला. माहिम येथील नरेश कन्हैयालाल राजवाणी यांच्याविरोधात पोलीस उप निरीक्षक मधुकर थावण यांनी बदनामीची खाजगी तक्रार कुर्ला महानगर दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याची दखल घेत कुर्ला न्यायालयाने राजवाणी याच्याविरोधात प्रोसेस जारी केले.
या प्रोसेसला राजवाणीने सत्र न्यायालयात अर्ज करुन आव्हान दिले. सत्र न्यायालयाने राजवाणीचा अर्ज फेटाळला. राजवाणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रोसेस रद्द करण्याची मागणी राजवाणीने केली. न्या. एन. आर. जमादार यांच्या एकल पीठाने ही मागणी मान्य केली नाही.
काय आहे प्रकरण
थावण हे चेंबूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना राजवाणीच्या संपका&त आले. राजवाणी रिअल इस्टेट एजंट आहे. थावण त्याच्यामार्फत दुकान घेणार होते. नंतर त्यांच्यात वाद झाला. पण राजवाणीने थावण यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व वरीष्ठांकडे तक्रार केली. थावण यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आहे, असा आरोप राजवाणीने केला. एसीबीने याची चौकशी केली. थावण यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता नसल्याचे स्पष्ट झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.