Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाली कांदा - बटाट्याचं दुकान अन, वर सुरु होता भलताच धंदा, पोलीसाचीं मोठी कारवाई

खाली कांदा - बटाट्याचं दुकान अन, वर सुरु होता भलताच धंदा, पोलीसाचीं मोठी कारवाई 


नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडू मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन पीडित मुलींची सुटका केली असून, मालकाला अटक करण्यात आली आहे. जय माहदेव जोशी असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे खाली कांदा, बटाटा विक्रिचे दुकान आणि दुसऱ्या मजल्यावर हा धक्कादायक प्रकार सुरू होता. नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये असलेल्या महात्मा फुले भाजीपाला बाजारातील एका इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरू होता. या दोन मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कांदे, बटाटे विक्रीचं दुकान आहे. तर दुसऱ्या मजल्यावर देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसंनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन पीडितांची सुटका करण्यात आली असून, मालकाना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील महात्मा फुले मार्केटमध्ये जोशी ट्रेडर्स नावाचे कांदे बटाटा विक्रीचे गोदाम आहे. ही दोन मजली इमारत आहे. या दोन मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर देह व्यापार सुरू आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार छापा मारत कारवाई करण्यात आली. दोन पीडितांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडितांची सुटका करत आरोपीला अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.