तुम्ही कुठेही फिरायला जाता, तेव्हा तिथे फोटो काढता. कारण पर्यटन स्थळी गेल्यानंतर तिथे फोटो काढणं फॅशन बनली आहे. लोक फक्त सुंदर ठिकाणीच नाही, धोकादायक ठिकाणी सुद्धा फिरायला जातात. तिथे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. हे क्षण कायम स्मरणात रहावेत, ही त्या मागची भावना असते. काहीवेळा पर्यटन स्थळी हटके फोटो काढताना तुमच्यासोबत दुर्घटना होऊ शकते. इंडोनेशियामध्ये एका चिनी महिलेसोबत असच काहीतरी घडलं. एका धोकादायक ठिकाणी पोझ देऊन ही महिला फोटो काढत होती. पण त्या नादात तिचा जीव गेला.
ही महिला धगधगत्या ज्वालामुखीच्या आत 250 फूट खाली पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. मेट्रो नावाच्या वेबसाइटने हे वृत्त दिलय. ती ज्वालामुखीच्या तोंडावर उभी राहून पोज देत होती. नवरा तिचे फोटो काढत होता. अचानक तिचा तोल ढासळला. ती अडखळत ज्वालामुखीच्या आता पडली. हुआंग लिहोंग असं या चिनी महिलेच नाव आहे. 20 एप्रिलची ही घटना आहे. ती इंडोनेशियाच्या पूर्वी जावा येथील बनयुवांगीमध्ये इजेन क्रेटर जवळ फोटो काढून घेत होती. तिथे तिच्यासोबत ही भयानक दुर्घटना घडली.
तिच्यामागे ज्वाळा वर येताना दिसतायत
महिला आणि तिचा नवरा झांग योंग स्थानिक गाइडसोबत वरती चढला होता. ज्वालामुखीच्या तोंडावर उभं राहून त्यांना सूर्योदय पहायचा होता. पण महिलेने फोटो काढण्यासाठी जशी पोज दिली, ती अडखळली व मागच्या बाजूला पडली. स्थानिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये महिला एक पाय वर उचलून ज्वालामुखीच्या तोंडावर पोज देताना दिसतेय. तिच्यामागे ज्वाळा वर येताना दिसत आहेत.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागला?
बचाव पथकाला महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन तासाचा वेळ लागला. ही घटना एक दुर्घटना होती. पर्यटकांनी माऊंट इजेनवर जाताना नेहमी सावधानता बाळगली पाहिजे. कारण माऊंट इजेन ज्वालामुखीच्या समूहाचा एक भाग आहे बानुवांगी क्षेत्राच्या संरक्षण विभागाचे प्रमुख द्वी पुत्रो सुगियार्तो यांनी ही माहिती दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.