Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रकाश आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचा धक्का, सांगलीच्या उमदेवारा बाबत घेतला मोठा निर्णय

प्रकाश आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचा धक्का, सांगलीच्या उमदेवारा बाबत घेतला मोठा निर्णय 


ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे हे सांगली मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला होता. मात्र, विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वंचितने प्रकाश शेंडगे यांचा पाठींबा काढला आणि विशाल पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला.


एका आंबेडकरांनी पाठींबा काढला असला तरी दुसरे आंबेडकर  हे प्रकाश शेंडगे यांच्या मदतीला धावले आहेत. प्रकाश आंबेडकरांचे बंधू, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर  यांनी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे. प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांना अकोल्याच्या जागेवर पाठींबा दिला होता. तो त्यांनी कायम ठेवला होता. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांना माजी मुख्यमंत्र्यांचे नातू विशाल पाटील हे वंचित वाटले असावेत म्हणून त्यांनी विशाल पाटलांना पाठींबा दिला असावा.

आमरावतीच्या जागेवरून आनंदराज आंबेडकर आणि वंचितमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. वंचितने या जागी उमेदवार घोषित केला होता. आनंदराज आंबेडकर हे येथून निवडणूक लढत होते. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी वंचितने त्यांना पाठींबा देत आपल्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगितले होते.

वंचितवर टीका

प्रकाश शेंडगेंनी वंचित बहुजन पार्टीवर टीका केली. ते म्हणाले वंचितच्या कल्याणासाठी स्थापन झालेली पार्टी प्रस्थापितांना पाठींबा देत आहे. बारामतीत चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठींबा देत आहेत. त्या कधीपासून वंचित झाल्या, असे शेंडगे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.