Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्व सामान्यासाठी आनंदाची बातमी! इतक्या स्वस्तात खरेदी करता येणार गॅस सिलेंडर

सर्व सामान्यासाठी आनंदाची बातमी! इतक्या स्वस्तात खरेदी करता येणार गॅस सिलेंडर 


मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो. अशातच आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला खूप स्वस्तात गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे. जाणून घ्या पद्धत.


पेटीएम गॅस सिलेंडर बुकिंग

तुमच्या माहितीसाठी हे समजून घ्या की पेटीएम गॅस सिलेंडर बुकिंगची संधी देत ​​आहे. तुम्हालाही नवीन गॅस सिलिंडर बुक करायचा असल्यास तुम्ही हे फॉलो करू शकता. ज्यावेळी तुम्ही पेटीएमच्या साइटला भेट देता त्यावेळी तुम्हाला दिसेल की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तीन रिचार्जवर कॅशबॅक ऑफर केला जातो. पण प्रत्येकाला हे मिळणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे. पेटीएमनुसार, ही ऑफर मोबाइल, मोबाइल, गॅस बिल पेटीएम, डीटीएच रिचार्ज, वीज आणि गॅस सिलेंडर बुकिंगवर लागू होणार आहे. या अंतर्गत बिल भरले तर तुम्हाला 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

यात प्रत्येक यूजरला विविध ऑफर्स मिळतील. त्यामुळे कॅशबॅकची रक्कम वेगळे असू शकते. पेटीएमच्या या विशेष ऑफर अंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुमची देय रक्कम 48 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असावी. इतकेच नाही तर तुम्हाला Amazon Pay च्या मदतीने पेमेंट करू शकता. यात तुम्हाला जबरदस्त ऑफर्सही मिळत आहेत. Amazon वरून गॅस सिलेंडर बुक केल्यावर 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देण्यात येत आहे.

असा मिळवा स्वस्त गॅस सिलिंडर

खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कॉल करण्यातही वेळ वाया घालवावा लागण्याची गरज पडणार नाही. अनेक लोक त्याचा वापर करत आहेत. तुम्हाला कुठेही कॅशबॅक वापरू शकता. हे बिल भरण्यासाठी आणि रिचार्जिंगसाठी वापरले जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.