Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांचा स्पीड ब्रेकर रंगवणे अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांचा स्पीड ब्रेकर रंगवणे अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद 


सांगली : सांगलीतील शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते आणि सांगली महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी राबविलेल्या स्व खर्चाने स्पीड ब्रेकर रंगविणे अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. दीपक चव्हाण यांनी एका महिन्यात 340 स्पीड ब्रेकर रंगवीत जागतिक रेकॉर्ड केला आहे. यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दीपक चव्हाण यांचा अचिव्हर म्हणून सन्मान करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली.

दीपक चव्हाण यानी आपल्या सामाजिक कामाचा ठसा सर्वदूर पसरविला आहे. आतापर्यंत दीपक चव्हाण यांनी 1 मे 2018 पासून स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे. पर्यावरण पूरक काम केले आहे. नदी स्वच्छता यासाठी एड्स निर्मूलन यासाठीही त्यांनी काम केले आहे. महापुरात आणि कोरोना काळात सुध्धा दीपक चव्हाण यांनी 555 दिवस जनजागृती केली आहे. याची दखल घेत दीपक चव्हाण यांची तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यानी महापालिकेच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी नियुक्ती केली तर आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी 75 ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत. 
तर नुकताच दीपक चव्हाण यांनी 8 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत सांगली मिरज कुपवाड शहर आणि उपनगर तसेच आजूबाजूच्या खेडे गावात रस्त्यावरील स्पीड ब्रेकरना स्वतःच्या खर्चाने पांढरे सुरक्षा पट्टे मारीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या एक महिन्याच्या काळात त्यांनी 340 स्पीड ब्रेकर दिवस रात्र रंगविले आहेत तसेच यासाठी त्यांना 30 ते 35 हजाराचा खर्च आला आहे. या त्यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल घेण्यात आली आहे. इंडिया बुक कडून दीपक चव्हाण यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेत स्पीड ब्रेकर रंगविण्याचे रेकॉर्ड झाल्याचे सांगितले आहे. 

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून नुकतेच दीपक चव्हाण यांची एक महिन्यात 340 स्पीड ब्रेकर रंगविण्याचे रेकॉर्ड केल्याचे मुख्य संपादक डॉ. बिश्र्वस्वरूप रॉय चौधरीं यांनी जाहीर करीत याबाबतचे रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल पाठविले आहे. दीपक चव्हाण यांच्या या रेकॉर्ड मुळे सांगलीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. सामाजिक उद्देशाने कोणताही स्वार्थ न बाळगता होणारे अपघात कमी व्हावेत यासाठी दीपक चव्हाण यांनी केलेल्या स्पीड ब्रेकर रंगविण्याची मोहीम आता जागतिक पातळीवर पोहचली आहे. या उपक्रमासाठी पत्नी प्रेरणा चव्हाण, आई शालन चव्हाण आणि बंधू सतीश चव्हाण, गणेश चव्हाण व मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य मिळाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.