मुंबई : उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत जाऊ शकतात, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच ते केवळ मुस्लिम मतांसांठी काँग्रेससोबत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे केवळ त्यांना मुस्लिम मतं मिळावी या एकाच गोष्टीसाठी काँग्रेससोबत आहेत, ही गोष्ट महाराष्ट्रातील मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवी. जशी निवडणूक संपली आणि जिंकून आले तर यांचं पुन्हा जुळेल. त्यामुळे नरेंद्र मोदींचं हे वाक्य सूचक आहे. म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या विरोधात कल्याणमध्ये अत्यंत कमकुवत उमेदवार दिला आहे," असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांचा मुलगा या नात्याने मी उद्धव ठाकरेंचा आदर करतो. त्यांच्यावर एखाद्या वेळी संकट आल्यास मदतीला जाणारा मी पहिला असेल असे ते म्हणाले होते. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. मोदी आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.