Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! बिर्याणीसाठी चक्क मांजरीच्या मांसाचा वापर? व्हिडिओ व्हायरल होताच घटना उघडकीस

धक्कादायक ! बिर्याणीसाठी चक्क मांजरीच्या मांसाचा वापर? व्हिडिओ व्हायरल होताच घटना उघडकीस 


तुम्ही मागवलेली बिर्याणी ही चिकनची नसून मांजरांची असेल हे तुम्हाला समजल्यास तुम्हाला किती मोठा धक्का बसेल याची कल्पना करा. चेन्नईतील पेरांबूर परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे. ‘नारीकुरावर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा एक गट मांजरींचे अपहरण करून त्यांना ठार करतात आणि नंतर त्यांचे मांस रेस्टॉरंटमध्ये विकत असल्याचे वृत्त समोर येत आहे. 2018 मध्ये या परिसरात मांजरी हरवण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यातच आता सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओमुळे बिर्याणी बनवण्यासाठी मांजरींच्या मांसचा वापर होत असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.


पेरांबूर, चेन्नई येथील नारीकुरवारांवर निष्पाप मांजरींचे अपहरण करत असल्याचा दावा लोक करत आहेत. अलीकडे, चेन्नईच्या स्पर टंक रोडवर भटक्या मांजरींना पकडणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आले रात्रीच्या अंधारात तो भटक्या मांजरी पकडत होता. त्या व्यक्तीने मांजरींना दुकानात विकल्याची कबुली दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.