Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोबाईलची बॅटरी लवकर संपते का ? मग सेटिंगमध्ये करा 'हा ' बदल, जाणून घ्या...

मोबाईलची बॅटरी लवकर संपते  का ? मग सेटिंगमध्ये करा 'हा ' बदल, जाणून घ्या...


फोनच्या बॅटरीची समस्या फार सामान्य आहे. तुमच्या फोनची बॅटरी संपण्याची समस्या काही गोष्टींद्वारे कमी केली जाऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठीचे काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात स्मार्टफोन सर्वांच्या आयुष्याच्या एक अविभाज्य घटक बनला आहे. फक्त कॉलिंगच नाही तर अनेक महत्त्वाची कामे आजकाल स्मार्टफोनच्या साहाय्याने सहज आणि जलद गतीने केली जातात. मग ते जेवण ऑर्डर करायचे असो की बँकेत खाते उघडे करायचे असो सर्व गोष्टींसाठी स्मार्टफोन वापर हा आहेच. अशातच सततच्या वापरामुळे आपल्या फोनची बॅटरी बऱ्याचदा कमी होते. अनेकांना तर कामाच्या व्यापामुळे फोन चार्ज करायलाही वेळ मिळत नाही.


फोनच्या बॅटरीची समस्या फार सामान्य आहे. तुमच्या फोनची बॅटरी संपण्याची समस्या काही गोष्टींद्वारे कमी केली जाऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठीचे काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.स्क्रीन ब्राइटनेस:अनेकदा आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही.मात्र फोनच्या उच्च स्क्रीन ब्राइटनेसमुळे बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनचा ब्राइटनेस कमी करून तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता.बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स:अनेकदा आपण एखादे ॲप चालू ठेवले की ते बंद करता दुसऱ्या ॲपवर जातो. असे केल्यामुळे अनेक ॲप्स तुमच्या फोनची बॅटरी खात असतात. जरी तुम्ही ते ॲप्स वापरत नसले तरीही हे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये सक्रिय राहतात. ज्याने तुमच्या फोनची बॅटरी कमी होऊ लागते.सोशल मीडिया ॲप्स, मेल सिंकिंग, लोकेशन सर्व्हिस आणि बॅकग्राउंडमध्ये चालणारे गेम ॲप्स मोठ्या प्रमाणात तुमच्या फोनची बॅटरी संपवत असतात. म्हणूनच मुखतः गरजेचे असलेलेच ॲप्स मोबाईलमध्ये ठेवावेत.बऱ्याचदा तुमच्या फोनचे लोकेशन ऑन ठेवल्यामुळेही तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपली जाते. GPS, हवामान संदर्भातील ॲप, फिटनेस ट्रॅकर सारखी ॲप्स बॅटरी लवकर फोनची बॅटरी लवकर संपवतात.
ब्लूटूथ, वाय-फाय आणि सेल्युलर डेटा चालू ठेवणे: ब्लूटूथ, वाय-फाय, आणि सेल्युलर डेटा सारख्या सेवा जर तुम्ही सतत चालू ठेवत असाल तर त्यामुळेही तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपून जाते.या समस्यांवर मात कशी करावी:तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असल्यास तुम्ही Settings > Battery > Battery Usage वर जाऊन तुम्ही iOS यूजर्स असल्यास सेटिंग्ज > बॅटरी पर्यायावर जा. बॅटरी सेव्हर मोड चालू करा. तुमचा स्मार्टफोन बॅटरी-सेव्हर किंवा पॉवर-सेव्हिंग मोडसह येतो. बॅटरीचे आयुष्य वाढविण्यात ही सेटिंग मदत करते.बॅटरी पातळी 20 ते 60% दरम्यान ठेवा:तुमच्या फोनची बॅटरी लेव्हल 20-60% च्या दरम्यान ठेवल्याने बॅटरीचे आरोग्य चांगले राहते. तुमची बॅटरी 20% पर्यंत पोहोचल्यावरच तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावा. बॅटरीचे नुकसान टाळण्यासाठी ती 60% असल्यावरच तिला चार्ज करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.