जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी (ता.८) जाहीर सभा होत आहे. मराठा आंदोलनाची धग अद्याप कमी झालेली नसल्याने अमित शहांनी याचा धसका घेतला असल्याचे बघायला मिळत असून या सभेला पाणी बॉटल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभेच्या आधी कडक असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या सभेला येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जातेय. सभेला पाणी बॉटल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेकजण सभेस्थळी जाण्यास नकार देत आहेत. या सर्व प्रकाराचा श्री. दानवे यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.