Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुस्लिम लिव्ह - इन रिलेशनशिपच्या अधीकाराचा दावा करू शकत नाही :, हायकोर्ट

मुस्लिम लिव्ह - इन रिलेशनशिपच्या अधीकाराचा दावा करू शकत नाही :, हायकोर्ट 


जोडीदार हयात असताना इस्लाम मानणारी कोणतीही व्यक्ती लिव्ह-इन-रिलेशनशिपच्या अधिकाराचा दावा करू शकत नाहीत, असं स्पष्ट मत अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केलं. त्याचवेळी कोर्टानं त्या व्यक्तीच्या लिव्ह इन पार्टनरला तिच्या आई-वडिलांकडे जाण्यास सांगितलं. विवाहसंस्थेच्या बाबतीत संवैधानिक नैतिकता आणि सामाजिक नैतिकता यांच्यात समतोल साधण्याची आवश्यकता आहे, असंही नमूद केलं.


उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अताऊर रहमान मसूदी आणि न्यायमूर्ती अजय कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. हा निर्णय देताना खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा नागरिकांच्या वैवाहिक स्थितीचा पर्सनल लॉ आणि आणि घटनात्मक अधिकार या दोन्हींतर्गत अर्थ लावला जातो, तेव्हा धार्मिक रीतिरिवाजांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. सामाजिक आणि धार्मिक प्रथा तसेच प्रथा आणि संविधानाने दिलेली मान्यता ज्याचे कायदे सक्षम विधिमंडळातकडून बनवण्यात आलेत, त्याचे स्त्रोत समान आहेत, असं न्यायालयाने म्हटलंय.

दरम्यान ही सुनावणी अपहरणाचा खटला स्थगित करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर झाली. या याचिकेत हिंदू-मुस्लीम जोडप्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये हस्तक्षेप न करण्याची मागणीही यात करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.