Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उंटाला का खायला देतात विषाऱी किंग कोब्रा? जिंवतच तोंडत सोडतात :, कारण......

उंटाला का खायला देतात विषाऱी किंग कोब्रा? जिंवतच तोंडत सोडतात :, कारण......


उंटाबद्दल वेगवेगळी व आश्चर्यकारक माहिती वेळोवेळी कळत असते. अरब देशांमध्ये उंटाला जिवंत साप खाऊ घालतात, ही त्यापैकीच एक बाब. असं का केलं जातं? खरं तर उंट शाकाहारी आहे आणि वाळवंटात अनेक दिवस पाणी न पिता फिरू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे; मात्र उंटाला किंग कोब्रा जिवंत का खाऊ घालतात, यामागे एक खास कारण आहे.

उंटाला एक जीवघेणा आजार होतो. त्यापासून त्याला वाचवण्यासाठी हे केलं जातं. या आजाराला हयाम असं म्हणतात. हा आजार झाल्यास उंटांना आपला जीव गमवावा लागू शकतो. या आजाराचे उपचारही विशेष पद्धतीने केले जातात. एखाद्या उंटाला हा आजार झाला तर त्याचं तोंड उघडलं जातं आणि त्याच्या तोंडात जिवंत कोब्रा साप सोडला जातो.

आजारात आखडू लागतं उंटाचं शरीर

उंटाला हयाम नावाचा हा आजार झाल्यावर तो खाणं-पिणं बंद करतो. त्याचं शरीरही आखडू लागतं. याशिवाय सुस्ती, सूज, ताप, अशक्तपणा अशी अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. अरब देशांमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये असं म्हणतात, की उंटाला असं काही होत असेल तर त्याला विषारी साप खायला घालावा. या आजारावर हा एकमेव इलाज आहे. उंटाचं तोंड उघडून जिवंत साप आत सोडला जातो. यानंतर पाणी ओतलं की तो साप पोटात जातो. त्यामुळे उंटाच्या अंगात सापाचं विष पसरतं. काही दिवसांत उंट पूर्णपणे बरा होतो.

पशुवैद्य काय म्हणतात?

यामागे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. कारण त्यांना या रहस्यमय आजाराबाबत फारशी माहिती गोळा करता आलेली नाही. पशुवैद्यकांच्या मते, ज्या आजारावर अशा प्रकारे उपचार केले जातात ते कीटक चावल्यामुळे होतात. मादी उंट गरोदर असल्यास या आजारामुळे तिचा गर्भपात होऊन मृत्यूही होऊ शकतो. उपचार न केल्यास उंटाच्या जीवाला धोका असतो. उंटाला साप खायला दिल्याने तो बरा होतो, या गोष्टीला पशुवैद्य फक्त एक परंपरा मानतात, त्याहून जास्त काही नाही.

उंट काय खातो?

उंटाच्या आहारात प्रामुख्याने झाडं, पानं, फळं, फुलं यांचा समावेश असतो. त्याच्या शरीराचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं कुबड असतं. उंट या कुबडात चरबी साठवतात. कडक उन्हात अन्न-पाणी मिळण्याची शक्यता नसताना ते या चरबीवर जगतात. या गुणामुळेच त्याला 'वाळवंटातलं जहाज' असं म्हटलं जातं. तो अनेक दिवस पाणी न पिता राहू शकतो. जेव्हा तो पाणी पितो तेव्हा तो एका वेळी 100-150 लिटर पितो. उंटाची उंची साधारणपणे सात फुटांपर्यंत असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.