Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजीच्या गाडीवर दुकानदारांने महिलेचा असा लावला फोटो, कारण आहे फारच खास....

भाजीच्या गाडीवर दुकानदारांने महिलेचा असा लावला फोटो, कारण आहे फारच खास....


विचार करा तुम्ही भाजी बाजारात गेलात, तिथे एका भाजीच्या गाडीवर तुम्हाला एका महिलेचा फोटो  पाहिला मिळेल, ज्यात ती तुमच्याकडे रागाने पाहातेय? यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल. साहजिकच पहिल्यांदा आपल्याला थोडी भीती वाटेल, त्यानंतर असा फोटो का लावला असा प्रश्न आपण त्या दुकानदाराला विचारु. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  झाला आहे. या फोटोत भाजीच्या गाडीजवळ असलेल्या एका झाडावर एका महिलेचा फोटो लावण्यात आलेला दिसतोय. हा फोटो पाहून युजर्सला हा फोटो का लावण्यात आला असेल असा प्रश्न पडलाय.



काय आहे व्हायरल फोटोचं सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो चांगलाच चर्चेत आलाय. व्हायरल फोटोत एक भाजीचा ठेला दिसतोय. या ठेल्यावर टोमॅटो आणि इतर भाज्या ठेवलेल्या दिसतायत. ठेल्याच्या बाजूला एक भलं मोठं झाड दिसत असून या झाडावर एका महिलेचा फोटो लावण्यात आला असून या फोटोतली महिाल प्रचंड रागात असलेली दिसतेय. हा फोटो बंगळुरमधल्या भाजी बाजारात असल्याचं बोललं जात आहे. हा फोटो का लावण्यात आला असेल असा प्रश्न लोकांना पडलाय. ज्याने हा फोटो लावलाय त्याचा नेमका उद्देश तरी काय असावा असा प्रश्नही युजर्सकडून विचारला जातोय.

वास्तविक हा फोटो फोटोशॉपच्या मदतीने बनवण्यात आला आहे. फोटोत दिसणारी ही महिला प्रत्यक्षात आहे की नाही याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हा फोटो लावण्यामागे दुकानदाराचा उद्देश केवळ कोणी उधारी मागू नये, उधारी मागणाऱ्यांकडे फोटोतली महिला रागाने पाहातेय इतकाच आहे. दुकानदाराने मजेशीर पद्धतीने उधारी मागणाऱ्यांना इशारा दिला आहे. ही पोस्ट @Niharika__rao सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. ही पोस्ट आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिली असून अनेकांना यावर लाईक केलं आह ुजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर युजर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय भाज्यांना कोणाची नजर लागू नये म्हणून या महिलेचा असा फोटो लावण्या आला असावा, तर एका युजरने म्हटलंय महिलेचा फोटो पाहिलापासून माझं हसू थांबत नाहीए.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.