दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यातील जवळच नातं काही नवीन नाही. शिवसेनेच्या राजकारणातही दादा चांगलंच सक्रिय होतं. शिवसेनेचा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी दादा कोंडके कार्यक्रमांना आवर्जून हजर राहायचे दमदार भाषण देखील करत. त्यांच्या भाषणात ते अनेक विरोधी नेत्यांविषयी बोलून मज्जा घ्यायचे.
'सोंगाड्या' या चित्रपटाच्या वादानंतर बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची मैत्री झाली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दादा कोंडके अनेक सभांमध्ये दिसू लागले होते. त्याकाळात शिवसेनेचा इतका जोर नव्हता. त्या काळात दादा कोंडके हे काँग्रेस नेत्यांविरुद्ध अगदी कमरेखाली जाऊन टीका करायचे. मात्र, कालांतरानं दादांनी सभेला जाणं हळू हळू कमी केलं, त्याच कारण म्हणजे शिवसेनेच्या काही नेत्यांनी दादांच्या विरोधात बाळासाहेबांचे कान भरायला सुरुवात केली होती. अनेकदा सभेमध्ये महत्त्वाच्या नेत्यांचं भाषण हे शेवटी ठेवलं जात होतं. पण मंत्र्यांच्या आधी दादांचे भाषण झालं की मंत्र्यांची चांगलीच पंचायत व्हायची. त्यांचा कारण स्वतः दादांनीच आपल्या आत्मचरित्रात सांगितलंय.
दादा कोंडके याविषयी म्हणाले की एकदा कणकवलीला नारायण राणे यांच्या सभेला ते गेले असतांना, आधी दादा कोंडके आणि नंतर नारायण राणे यांचं भाषण होतं. दादाचं भाषण बघायला तुफान गर्दी झाली. भाषण तितकंच गाजलं देखील. मात्र, जस दादांचं भाषण संपलं तसं लोक उठायला लागली. ते पाहून नारायण राणे याना काळजी वाटू लागली आणि त्यांनी लागेच माईकवर येऊन लोकांना सांगितलं की तुम्हाला दादांची गाणी ऐकायची आहेत ना मग सर्वांनी खाली बसा, हे ऐकून लोक पुन्हा खाली बसले.मंत्र्यांच्या भाषणापेक्षा दादांचं भाषण ऐकायला लोकांना जास्त उत्सुकता होती आणि हीच गोष्ट शिवसेनेच्या काही मंत्र्यांना आवडत नसे. त्यामुळे शिवसेना नेते दादांना आपल्या प्रचारसभेत बोलवायला टाळू लागले, म्हणूनच त्यानंतर जेव्हा शिवसेनेची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्र्यांनी दादांना आपल्या कोणत्याही समारंभाचे आमंत्रण देणं बंद केलं होतं.
दादा त्यांच्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात म्हणाले की, "ज्या शिवसेनेसाठी मी उभ्या-आडव्या महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या, उन्हातान्हाची पर्वा न करता शिवसेना नेत्यांचा प्रचार केला त्यांच्याच राज्यात मला अशी वागणूक मिळत आहे याचं मला खूप वाईट वाटतं. हे मी सर्व बाळासाहेबांच्या मैत्रीखातर निस्वार्थी मनानं केलं पण एक माणुसकी म्हणून तरी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माझ्याशी आपुलकीने वागावं अशी अपेक्षा मी करू शकत नाही का? यश मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीनं आपल्या जवळच्या माणसांना विसर...तसेच माझ्या बाबतीत हे मंत्री वागत आहेत".
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.