मुंबई : तुम्ही अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात का? अक्षय्यतृतीयेला सोनं-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. यंदा अक्षय्यतृतीया 10 मे रोजी आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव बऱ्याच शहरांमध्ये 72,000 रुपयांच्या वर आहे.
अलीकडेच सोन्याने 75,000 रुपयांची पातळी ओलांडली होती. सोन्याच्या किमती जास्त असूनही अक्षय्यतृतीयेला तुम्हीही सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून, तुम्ही तुमच्या बजेटमध्ये शुद्ध सोने खरेदी करू शकाल. असं नको व्हायला की तुम्ही इतकं महाग सोनं खरेदी करून घरी आणाल आणि ते खोटं निघेल.
1. सोनं खरेदी करताना शुद्धता सर्वांत महत्त्वाची असते. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते, देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत सर्वाधिक आहे. तुम्ही जे सोनं घेताय त्याची शुद्धता तपासणं गरजेचं आहे, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे. बीआयएस भारतीय मानक ब्युरो हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करण्यास सांगतात. सोन्याचे दागिने आणि नाण्यांवर शुद्धतेचा ठसा असणं महत्त्वाचं आहे. ते नसेल तर असे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करू नयेत.
2. सोन्याची किंमत त्याच्या वजनाच्या आधारावर ठरवली जाते आणि बाजारातील दरांत चढ-उतार होऊ शकतात. तुम्ही खरेदी करत असलेले सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या नाण्यांचं वजन तपासा आणि कॉस्ट व्हॅल्युएशन आणि बाजार दरही तपासा. ज्वेलर्स अनेकदा दागिने किंवा नाण्यांवर मेकिंग चार्जेस किंवा वेस्टेज चार्ज घेतात, जे डिझाईननुसार बदलू शकतात. जास्त पेमेंट न करण्याण्यासाठी, मेकिंग चार्जेस तपासा.3. सोनं विकत घेण्याआधी बजेट तयार करा व त्यावरच ठाम राहा. सोन्याच्या आकर्षणात बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करणं योग्य नाही. तुमचं फायनॅन्शिअल टार्गेट सेट करा आणि त्यात तडजोड करू नका.4. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, पण ते खरेदी करताना हे लक्षात ठेवा की ते गुंतवणुकीसाठी आहे की सण साजरा करण्यासाठी आहे की सणाशी जोडलेल्या भावनिक अटॅचमेंट आहे म्हणून खरेदी करत आहात? तुम्ही गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करत असाल, तर तुम्ही सोन्याची नाणी घेऊ शकता, कारण ते विकत घेणं व विकणं सोपं जातं. दुसरीकडे, दागिन्यांवर मेकिंग चार्ज असतो. त्यांची खरेदी आणि विक्री नाण्यांपेक्षा थोडी महाग असते.
5. सोनं खरेदी करताना सर्टिफिकेशन साईन चेक करा, त्यातील सोन्याची शुद्धता व वजन बघा. हॉलमार्कचा ठसा पाहा, त्यामुळे भविष्यात सोनं विकणं किंवा बदलणं सोपं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.