भाजप नेते कार्यकर्त्यांच्या एकसंघ शक्तीची प्रचारात मुसंडी ; संजयकाकांना आपल्या भागातून मताधिक्य देण्यासाठी चढाओढ
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारलेली आहे. आजी, माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दररोजच्या कामकाजाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जात आहे. महायुतीच्या मित्र पक्षांची भक्कम साथ लाभली असून मतदारसंघात उत्सवाचे वातावरण आहे. घर भेटी, सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा झाल्या असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे.
पक्ष निरिक्षक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सर्व निवडणुक प्रचार प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सर्व मतदारसंघातील नेते कार्यकर्ते यांच्या बरोबर समन्वय साधत आहेत. संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराजी बाबत प्रसार माध्यमातून चर्चा झाली. परंतु मोठ्या जल्लोषात प्रचंड गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातील सर्व घटक एकसंघ झाले. खासदार संजयकाका पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाचा अनेकवेळा दौरा केला. त्यांनी केलेली विकास कामे आणि जनतेतून मिळणारा प्रतिसाद हाच त्यांच्या विजयाचा साक्षात्कार आहे.
वरिष्ठांकडून सर्व नेत्यांना संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सुचना केल्या आहेत. भाजपा हा कामाला प्राधान्य आणि प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. त्यामुळे आजी, माजी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी यांना आपल्या भागातून मताधिक्य द्यावे लागणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाभर प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला. मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केले आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आजी, माजी नगरसेविका, नगरसेवक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सुरवातीपासून बैठका घेऊन मार्गदर्शन करून भाजपा अंतर्गत सर्व संघटना कार्यरत केल्या आहेत. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काल माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी संजयकाका यांच्या सोबत प्रचार दौरा केला. सर्वात जास्त मताधिक्य देण्याची घोषणा देशमुख यांनी केली आहे.खानापूर आटपाडी मध्ये शिवसेनेचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभैय्या बाबर यांनी संजयकाका पाटील यांची हॅटट्रिक पूर्ण करण्याचे स्वर्गीय अनिलभाऊ यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे सांगितले आहे. त्यांच्या सोबत आटपाडीतून तानाजी पाटील प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष वैभवदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात प्रचार दौरा केला आहे.तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्र हे खासदार संजयकाका पाटील यांचे होम ग्राऊंड आहे त्यामुळे तिथे लाखांचे मताधिक्य मिळणार आहे. होम ग्राउंड वरून दररोज तीन हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि महिला संपूर्ण मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहेत. जत तालुक्यातील स्वार्थासाठी टिका करणाऱ्यांना बाजूला करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य तमनगोंडा रवी पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश जमदाडे, डॉ. रविंद्र आरळी यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी जत तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रचार केला आहे.एकंदरीत भाजपाचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एक संघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारलेली आहे. सर्व नेत्यांनी संजयकाका पाटील यांना आप आपल्या भागातून मताधिक्य देण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे मताधिक्य देण्यासाठी चढाओढ सुरू असलेली पहायला मिळत आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीचे मित्र पक्षांची भक्कम साथ लाभली आहे. प्रचारात महिलांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. विज महा मंडळाच्या संचालक सौ. निता केळकर, भारती दिगडे, गीतांजली ढोपे पाटील, सौ. सुमनताई सुरेश खाडे, सौ. मंजीरीताई सुधीर गाडगीळ, माजी महापौर संगीता खोत, गीताताई सुतार यांच्यासह हजारो महिला प्रचार करत आहेत.
खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सर्व कुटुंब प्रचार दौरे करत आहे. यामध्ये सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील, मुलगी वैष्णवी, मुलगा प्रभाकरबाबा पाटील, स्नुषा शिवानी प्रभाकर पाटील प्रचारात सक्रिय आहेत. सर्व पातळीवर नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उत्साहात प्रचार यंत्रणा राबवत असल्याने संजयकाका पाटील यांना किती लाखांचे मताधिक्य मिळणार एवढीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.