Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनील तटकरेनी केला महत्वाचा खुलासा :, म्हणाले

छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनील तटकरेनी केला महत्वाचा खुलासा :, म्हणाले 


बारामती लोकसभेच्या मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.


काय म्हणाले सुनिल तटकरे?

"छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्याबाबत चर्चा झाली होती. ती सत्य बाब आहे. भुजबळ साहेब स्वाभिमानी नेते आहेत. पाच दशके त्यांनी राजकारणात घालवलीत. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे असे म्हणत छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे," असे स्पष्टीकरण सुनिल तटकरे यांनी दिले.

तसेच "पक्षाचे जेष्ठ नेते भुजबळ साहेब यांनी कांदा, द्राक्षाबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी त्यांचे खास अभिनंदन केले. पूर्ण क्षमतेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील, माझ्या मतदार संघाचा त्यांनी आढावा घेतला," असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, अजित पवार गट स्वगृही परतणार का? याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. पक्षामध्ये आता नवीन चेहरे पुढे आले आहेत. सिलेक्तिव्ह लोकांचा विचार त्या भागातल्या मतदार संघात जाऊन विचार करून निर्णय घेऊ पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे जयंत पाटील म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.