लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सभेपूर्वी उसळलेल्या गर्दीमुळे गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. बुधवारी इचलकरंजीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामुळे दोन्ही नेत्यांना बघण्यासाठी येथे मोठी गर्दी झाली होती. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी गर्दी उसळल्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. गर्दीने लोकांना चेंगरल्यामुळे काहींना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. इचलकरंजीमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केंद्रातल्या राज्यातल्या सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सभेमध्ये हजारो लोकांनी गर्दी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.