देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभेसाठी पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशभरातली शिक्षकांना निवडणुकांमध्ये जबाबदाऱ्या असतात. दरम्यान, निवडणुकीच्या कामातून वाचण्यासाठी एका शिक्षकाने अनोखी शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. यामुळे आता त्या शिक्षकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हरियाणाच्या जिंदमध्ये निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी एका पुरुष शिक्षकाने गर्भवती महिलेचा वेश धारण केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी व डीसी यांनीही शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून खडसावले. चौकशी समितीची स्थापन करण्यात आली आहे.
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवलं......
निवडणूक ड्युटीसाठी जिल्हा प्रशासनाने विभागांकडून कर्मचाऱ्यांची आकडेवारी मागवली होती. डहौला येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाने जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीत पीजीटी हिंदी या पदावर कार्यरत सतीश कुमार ही गर्भवती महिला असल्याचे दाखवण्यात आले आहे.यामुळे सतीश कुमार यांना कुठेही ड्युटी देण्यात आली नाही. ही बाब समजल्यानंतर डीसीने गुरुवारी पीजीटी सतीश कुमार, मुख्याध्यापक अनिल कुमार आणि शाळेतील संगणक ऑपरेटर मनजीत यांना बोलावून घेतले, त्यांची चौकशी केली. प्राचार्य यांनी सांगितले की, ही चूक ना त्यांच्या स्तरावर होती ना गटशिक्षणाधिकाऱ्यांची, ही चूक कोणी केली हे त्यांना माहीत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.