Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेक्स स्कँडलमुळे या नेत्याचेही करियर झाले उध्वस्थ :, राज भवनात नको ते कृत्य अन द्यावा लागला राजीनामा

सेक्स स्कँडलमुळे या नेत्याचेही करियर झाले उध्वस्थ :, राज भवनात नको ते कृत्य अन द्यावा लागला राजीनामा 


नवी दिल्ली : जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा सध्या सेक्स स्कँडलमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यावर अनेक वर्षांपासून ३०० ते ४०० महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. अशा सुमारे ३ हजार व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. मात्र, भारतीय राजकारण्यांकडून लैंगिक छळ किंवा लैंगिक शोषणाची किंवा लैंगिक व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक राजकारण्यांवर आपल्या पदाचा वापर लैंगिक अत्याचारासाठी केल्याचा आरोप झाला आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आणखी बडे नेते कोण होते हे जाणून घेऊया...


राघवजी सेक्स सीडी स्कँडल 

* मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राघवजी यांचे या सेक्स सीडी स्कँडलमध्ये नाव समोर आले होते. २००३ मध्ये त्यांचा घरकामगार राजकुमार डांगी याने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. साडेतीन वर्षांपासून आपला छळ करण्यात आला. 

* राघवजी यांनी त्यांना सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते. त्याच्याशी संबंधित सेक्स व्हिडीओची सीडी समोर येताच ते गायब झाले होते.

* राजकुमारने आपल्यावर झालेल्या या अत्याचाराच्या घटनांच्या २२ सीडी तयार केल्या होत्या. या प्रकरणानंतर त्यांना अटक करण्यात आली होती आणि पक्षातून काढण्यात आले होते.

माजी मुख्यमंत्री तिवारी

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा लैंगिक संबंधांचा व्हिडीओ २००९ मध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते स्वत:पेक्षा खूपच कमी वयाच्या मुलीसोबत लैंगिक कृत्य करताना दिसत होते. त्यावेळी काँग्रेस नेते एनडी तिवारी आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. या व्हिडीओवरून बरीच टीका झाल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेच्या वेळी तिवारी ८६ वर्षांचे होते.

एचवाय मेथी सेक्स स्कँडल 

* कर्नाटकचे तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री एचवाय मेथी यांच्याशी संबंधित सेक्स स्कँडल २०१६ मध्ये उघडकीस आले होते. यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता.

* व्हिडीओमधील महिला २६ वर्षीय फिजिओथेरपिस्ट असून, ती राज्याच्या आरोग्य विभागात काम करते. ती मंत्र्याला काही मदत मागण्यासाठी गेस्ट हाउसवर गेली असता तिला पाहून मंत्र्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले होते. त्यावेळी मेथी ७१ वर्षांचे होते. इतर प्रकरणात २०२१ मध्ये कर्नाटकचे माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी संबंधित एक सीडी चर्चेत 
आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.