Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजयकाकांच्या प्रचारार्थ सांगलीत झंझावाती मोटरसायकल रॅलीने प्रचंड शक्ती प्रदर्शन

संजयकाकांच्या प्रचारार्थ सांगलीत झंझावाती मोटरसायकल रॅलीने प्रचंड शक्ती प्रदर्शन


सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगलीमध्ये तरुणांनी झंझावाती मोटरसायकल रॅली काढून प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. ठिकठिकाणी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. माता भगिनींनी औक्षण करून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या तरूणांनी काकांच्या विजयाची जल्लोषपूर्ण घोषणाबाजी करत आसमंत दुमदुमून सोडला. फटाक्यांची आतषबाजी उत्साह यामुळे जणूकाही विजयी मिरवणूक असल्या सारखे वाटत होते. ठरलंय नक्की हॅट्रिक पक्की! हा नारा सत्यात उतरवण्यासाठी अवघी तरूणाई रस्त्यावर उतरली होती.

संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ निघणाऱ्या या मोटरसायकल रॅलीची सांगलीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन दिवसांपासून रॅलीची चर्चा रंगली होती. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासून शहरातील तरूणाई मोठ्या उत्साहात आपल्या दुचाकी घेऊन विश्रामबाग गणपती मंदिर परिसरात जमू लागले होते.

विश्रामबाग गणपती मंदीर जवळ या मोटरसायकल रॅलीचा झंझावात सुरू झाला. प्रचंड जल्लोषात संजयकाकांच्या विजयाच्या घोषणा देत रॅली पुढे सरकत होती. १०० फुटी रोडने कोल्हापुर रस्त्यावरून रॅली शास्त्री चौकात आली. विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. सिव्हील हॉस्पीटल मार्गे राम मंदीर चौक, पंचमुखी मारूती रोड मार्गे रॅली शिवतीर्थावर आली. शिवतीर्थावर रॅली येताच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील श्रींचे राज्य व्हावे यासाठी नागरिकांनी संजयकाकांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. 

रॅली पुढे मारूती मंदीर हरभट रोड वरून टिळक स्मारक मंदीर अशी पुढे गणपती मंदीरा जवळ आली. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.  गणपती पेठेतून रॅली सराफ कट्टा, कापड पेठ - बालाजी चौकातून राजवाडा चौक, पटेल चौक, सांगली कॉलेज कॉर्नर- टिंबर एरिया, रेल्वे पुला खालून अहिल्यादेवी होळकर चौक येथे आली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी यामुळे वातावरण अधिकच आनंदमय उत्साही आणि हॅटट्रिक होणार हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवत होत. रॅली पाहण्यासाठी आणि संजयकाकांना निवडणुकीच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती. चौकात तरूण संजयकाकांना खांद्यावर घेऊन मिरवत होते. 

अहिल्यादेवी होळकर चौकात पुष्पवृष्टी करून परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. लक्ष्मी मंदीर, विश्रामबाग पुलावरून विश्रामभाग येथे क्रांतीसिंह नाना पाटील चौकात रॅली आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. संजयकाका पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार करून रॅलीची सांगता करण्यात आली. हजारो तरूणांच्या जल्लोषी सहभागाने मोटरसायकल रॅली काढत प्रचंड शक्ती प्रदर्शनाने प्रचाराची सांगता झाल्यामुळे एकच हवा! संजयकाका! असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रचंड मताधिक्याने संजयकाका पाटील यांचा विजय होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.