Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजकाल अनेकांना हाताऐवजी चमच्याने अन्न खायला आवडते. परंतु पूर्वी सर्व लोक हाताने अन्न खात होती, पाचही बोटांचा उपयोगग करून अन्न खाण्याच्या यापूर्वी होती.

आजकाल अनेकांना हाताऐवजी चमच्याने अन्न खायला आवडते. परंतु पूर्वी सर्व लोक हाताने अन्न खात होती, पाचही बोटांचा उपयोगग करून अन्न खाण्याच्या यापूर्वी होती.


परंतु आता हाताने अन्न खाणे अनेकांना नको वाटते किंवा ऑफिस आणि इतर ठिकाणी काहींना हाताने खाण्यात कमीपणा वाटतो. अशा परिस्थितीत अन्न खाण्याची कोणती पद्धत अधिक चांगली आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. शास्त्रानुसार चमच्याने जेवण न करता हाताने खाणे अधिक फायदेशीर मानले जाते कारण हाताच्या पाच बोटांवर पाच बिंदू असतात आणि त्याचा जेवताना उत्तमरित्या वापर होतो असे मानले जाते. 

हाताने अन्न का खावे?

शास्त्रांनुसार हाताचा अंगठा अग्निशी संबंधीत आहे, तर तर्जनी वायूशी (हवा) संबंधीत आहे. याशिवाय हाताची मध्यमा आकाशाशी निगडीत असते आणि हाताची अनामिका पृथ्वीशी निगडीत आहे असे मानले जाते. तसेच हाताची करंगळी जल म्हणजेच पाण्याशी जोडलेली असते. जेव्हा आपण हे पाच बोट एकत्र करून अन्न खातो, तेव्हा त्याचा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो. यामुळे पचनसंस्था तर निरोगी राहतेच, शिवाय काही अवयवांचे कार्यही सुधारते. त्यामुळे चमच्याने खाण्यापेक्षा हाताने अन्न खाणे अधिक फायदेशीर असते असे मानले जाते. 

हाताने खाण्याचे फायदे

पचनक्रिया चांगली राहते : हाताने खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. कारण आपल्या हातात 'नॉर्मल फ्लोरल' नावाचे काही बॅक्टेरिया असतात जे आपल्या हाताच्या तळव्यावर आणि बोटांवर आढळतात. हे हानिकारक नसतात. परंतु शरीरातील विविध हानिकारक जंतूंपासून आपले संरक्षण करतात. जेव्हा आपण आपल्या तोंडात अन्न ठेवतो तेव्हा आपण आपल्या बोटांची योगमुद्रेप्रमाणे हालचाल करतो, त्यामुळे अन्न जलद पचन होण्यास मदत होते.


रक्ताभिसरण सुधारण्यास मदत : हाताने अन्न खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यास मदत होते. याशिवाय जसे तुम्ही हात हलवता तसे शरीरातील अनेक गोष्टी बदलतात. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवायचे असेल तर हाताने अन्न खाणे चांगले असते.

बोटे तापमान सांगतात : जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा तुमच्या बोटांच्या बिंदूंवरून अन्नाचे तापमान कळते. यामुळे तुम्ही जे खाणार आहात त्यासाठी तुमचे मन तयार होते. आयुर्वेद सांगते की हाताने अन्न खाल्ल्याने शरीर त्या आवश्यक एन्झाईम्स तयार करते आणि त्यामुळे तुमचे अन्न लवकर पचण्यास मदत होते.

(अस्वीकरण: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेला आहे. हा वैद्यकीय किंवा उपचाराचा सल्ला म्हणून घेऊ नयेत. कोणताही उपाय करून पाहाण्याधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.