राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचं 10 जूनला मतदान होतंय. मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालीय. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून 13जूनला मतमोजणी होईल.
कशी असणार निवडणूक प्रक्रिया?
निवडणुकीची प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणर आहे. इच्छुक उमेदवारांनी 22 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी 24 मे रोजी होणार तर आहे. अर्ज मागे घ्यायचा असेल 27 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मगे घेता येणार आहे.
कोणत्या चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार?
विलास विनायक पोतनीस - मुंबई पदवीधर (ठाकरे गट)निरंजन वसंत डावखरे - कोकण पदवीधर (भाजप)किशोर भिकाजी दराडे - नाशिक शिक्षक (ठाकरे गट)कपिल हरिश्चंद्र पाटील - मुंबई शिक्षक (लोकभारतीपदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
कशी पार पडते निवडणूक प्रक्रिया?
विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुले मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावे लागते. पण विधान परिषद आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवार ना पसंती क्रम देता येतो. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषद स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी सभागृहाचे एकास तीन सदस्य निवृत्त होतात तेवढेच नव्याने निवडतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.