Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम व्यावसायीकाकडून तरुणीवर बलात्कार

बांधकाम व्यावसायीकाकडून तरुणीवर बलात्कार 


पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने घरामध्ये केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध  ठेवले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी  दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एप्रिल 2024 ते 11 मे 2024 या कालावधीत खडकवासला धरण  परिसरातील लॉजमध्ये आणि आरोपीच्या घरात वारंवार घडला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी  आरोपीला अटक केली आहे.

याबाबत 24 वर्षीय तरुणीने (सध्या रा. पुणे मुळ रा. अहमदनगर) सोमवारी (दि.13) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रविण बंब Pravin Bamb Pune (वय-45 रा. लालबाग सोसायटी, मार्केटयार्ड रोड पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 366, 354अ, 323, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्यामाहिती नुसार, आरोपी प्रविण बंब बांधकाम व्यावसायिक असून तो शेअर मार्केटचे  देखील काम करतो. आरोपीची आई आजारी असल्याने ती घरात बेडवर पडून आहे. तिची देखभाल करण्यासाठी पीडित तरुणी केअर टेकर म्हणून काम करते.  घरात काम करत असताना आरोपीने वेळोवेळी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले.  तसेच तिला जबरदस्तीने बेडरुममध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर गळा दाबून मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली.

आरोपीने पीडित तरुणीला फिरायला चल असे विचारले असता तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवले. तिला खडकवसाला परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला मारहाण करुन बिअर पाजून पुन्हा अत्याचार करुन याबाबत कोणाला काहा सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.