अज्ञात कारणावरून एका मजूराचा डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना काल रात्री साडेआठच्या सुमारास विटा येथील विटा - क-हाड रस्त्यावरील गुरुप्रसाद प्लाझा बिल्डींगच्यासमोर घडली. राजेंद्र भाऊसो यादव ( वय ५८, कडेपूर, ता. कडेगांव ) असे खून झालेल्या मजूराचे नांव आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी सागर अशोक वाघमारे ( वय 30 शाहूनगर, विटा, ता.खानापूर ) यास ताब्यात घेऊन अटक केल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले. याबाबत पार्थ विकास यादव ( कडेपूर, ता. कडेगांव ) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.संशयित सागर वाघमारे याने राजेंद्र यादव या मजूराच्या डोक्यात फरशी मारली. त्यात यादव गंभीर जखमी झाले. त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मेमाणे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.