स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराज यांचं नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात साक्षी गणेश इथं त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. कालीचरण महाराज यांनी धर्म, ईश्वर याशिवाय इतर अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं.
दरम्यान, यावेळी ईश्वराबाबत बोलताना त्यांनी केलेल्या विधानांनुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, सध्याची परस्थिती आता दिसत आहे. पूर्वी काय होती आणि आता काय आहे? ह्या परस्थितीची परिपूर्ण जाणीव करून देतो. माणुसकी आपल्याला धर्म शिकवणार आहे. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे , पिणे, झोपणे, सेक्स करणे हे लक्षण पशूमध्ये असतात. ढोरांमध्ये आणि माणूस ही या गोष्टी करतो.
ईश्वराबद्दल बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की, अध्यात्म विज्ञानानम.. अध्यात्म शब्दाचा काय अर्थ ईश्वराच्या बाबतीत? धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडा वेळा संभोग केल्यावर जो अंनाद मिळतो त्या पेक्षा जास्त आनंद हा मिळाला पाहिजे. टार्गेट पूर्ण करून देणारं टार्गेट म्हणजे धर्म. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या... सर्व भोगून घ्या... चांगल्या फुलाचा वास घ्या.. नाकाचा सुगंध घ्या.. हा सर्व आनंद संपून जाईल मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही.
मी वाईट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. धर्म म्हणजे काय आपला धर्म त्यांचा धर्म. ज्याची धर्माप्रती निष्ठा नसते ते लोट्यासारखा असतो. घरमाशीची प्रवृत्ती त्यांना सगळे घराबाहेर काढतात. मधमाशीचे मधुमक्षिका पालन होत आहे एवढं सन्मान आहे. नाका तोंडातून आलेला बाहेर पदार्थ कप किंवा उलटी असते पण आपण मध म्हणून वापरतो. आपण मध माशी सारखे कसे बनू? असा प्रश्नही त्यांनी विचारला.कालीचरण महाराज म्हणाले की, देवी मानणारे ईश्वर मानत नाही. इस्लाम आणि ख्रिश्चन पुनर्जन्म मानत नाही ते धर्म नाही. मी कुराणाचा ब्रँड अँबेसिडर आहे , मुस्लिम लोकं जो प्रचार करत नाही तो मी करतो. येशूने खिळे ठोकून घेतले आणि पूर्ण जगाचे पापा फेडून घेतले. हिंदू म्हणजे काय ? अच्छे को छेडना नाही बुरे को छोडणा नाही. काही हरामखोरांनी म्हटलं इकडे मारलं तर इकडेही मारून घ्या. चु** बनण्याचा उद्देश देऊन देशाचा सत्यानाश केला.लव्ह जेहाद, लँड जेहाद नंतर आता देशात यूपीएससी जिहाद आलाय. यूपीएससी परीक्षा उर्दू मधून घेण्याची मागणी करण्यात आली. परीक्षा देणारा , पेपर चेक करणारा हे उर्दू माहिती असलेले मुस्लिम व्यक्ती असणार. साईबाबांना मुसलमान घोषित करण्याचं षडयंत्र हा लँड जिहाद चा प्रकार आहे. मती मंद बालक राहुलच्या गोष्टी आहेत. बाप दादांनी भारत तोडला तो भारत जोडायला निघाला असंही कालीचरण महाराजांनी म्हटलं.
भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद , लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का ? यावर कठोर कायदा झाला पाहिजे. महामुनी अगस्त्य ऋषी माझे गुरू आहेत. माझ्या रूममध्ये अगस्त ऋषी ब्रम्ह मुहूर्तावर प्रगट झाले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला सांगतोय. आता मी काही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्या पिढीला सांगा. जर तुम्ही आता सावरले नाही तर मारणार आहे. पण पिंडदानसाठी कोणीही उरणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.