Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात अजित पवार आणि बिहारमध्ये नितिशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली!

महाराष्ट्रात अजित पवार आणि बिहारमध्ये नितिशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली!


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या दोन टप्प्यांसाठी भाजपकडून देशपातळीवर प्रचारासाठी जोर लावला जात असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी फोडण्यापूर्वी महाविकास आघाडीचे भाग होते, तर नितीश कुमार महागठबंधन सरकारमध्ये होते. दोन्ही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला होता. आता निवडणूक मध्यावर आल्यानंतर हेच दोन नेते अचानक गायब झाल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.


अजितदादांची अन् नितीशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली!

विशेष म्हणजे बंगालमध्ये इंडिया आघाडीत सामील न होता स्वतंत्र निवडणूक लढवत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची सत्ता आल्यास बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणाकेली आहे. त्यामुळे सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनावेळी मंगळवारी वाराणसीत दिग्गजांनी एकच गर्दी केली होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार गेले नाहीत. विशेष म्हणजे दोघेही आजारी असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांच्या टायमिंगवरून चर्चा रंगली आहे. मोदी यांच्या मुंबईच्या रोड शोमध्येही अजित पवार सहभागी झाले नाहीत.दरम्यान, उद्याच्या (17 मे) सभेत अजित पवार सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. बारामती मतदान झाल्यानंतर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी मौन बाळगणे पसंत केले होते.

नितीशकुमार गेले कोणीकडे?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वात जवळचे नेते सुशील कुमार मोदी यांच्या निधनानंतर, मंगळवारी त्यांनी पाटण्यात राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले, परंतु नितीश कुमार स्वतः पाटण्यात असूनही दिघा घाटावर गेले नाहीत.

नितीश कुमार दिवंगत पत्नी मंजू सिन्हा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 14 मे रोजी पाटण्याच्या कंकरबाग उद्यानातील पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत होते, त्यांच्या 17 व्या पुण्यतिथीला देखील ते गेले नाहीत. त्यामुळे प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते, त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याबाबत एक ओळीचा सरकारी आदेश जारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान मुख्यमंत्र्यांचे फोटो पाहून बिहारची सामान्य जनताही त्रस्त झाली आहे. नितीशकुमार आणखी अडचणीत आहेत का? मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे हेल्थ बुलेटिन जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांची टाळाटाळ

जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या कारमध्ये दिसले, तेव्हा लगेचच काहीतरी गडबड झाल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या 24 तासांनंतर, त्यांचे पाच दशके जुने सहकारी सुशील मोदी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि दुसऱ्याच दिवशी सरकारने मुख्यमंत्री आजारी असल्याची माहिती दिली, त्यामुळे त्यांचे सर्व सार्वजनिक उपक्रम पुढे ढकलण्यात आले. परंतु, नितीश कुमार यांच्या आजाराबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. परिस्थिती अशी आहे की ते आजारी कसे? असा प्रश्न थेट मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारीच टाळत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.