वेस्ट यॉर्कशायर : आजकालची पिढी शारीरिक संबंधांबाबत वेगवेगळ्या फँटसी बाळगून आहे. काहीजण त्या प्रत्यक्षात उतरवण्याचाही प्रयत्न करतात. ब्रिटनमध्ये असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तिथे, शारीरिक संबंधांदरम्यानच्या खेळामुळे प्रेयसी आणि प्रियकराला दोघांनाही जीव गमवावा लागला. जॉर्जिया ब्रूक (26) असं मृत तरुणीचं नाव आहे. डान्सर असलेल्या जॉर्जियाचा फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट यॉर्कशायरमधील ब्रॅडफोर्ड येथे राहत्या घरी मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षांचा बॉयफ्रेंड ल्यूक कॅननशी सेक्स गेम सुरू असताना तिचा श्वास कोंडला गेला त्यानंतर तिचा गुदमरून मृत्यू झाला.
या प्रकरणी झालेल्या तपासात असं निदर्शनास आलं की, दोघांनी जीएचबी आणि कोकेन ड्रग्ज घेतलं होतं आणि दोघेही बराच काळ एकत्र होते. दोघांच्या फोन चॅटिंगवरून उघड झालं की, शारीरिक संबंधादरम्यान दोघं अनेकदा गेम खेळले होते. जॉर्जिया तिच्या बॉयफ्रेंडला या प्रकारच्या गेमसाठी आधीच संमती दिली होती.
या प्रकरणाची चौकशी करणारे कोरोनर (सरकारी तपास अधिकारी) मार्टिन फ्लेमिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जियाचा मृत्यू नैसर्गिक नसून बेकायदेशीर हत्या आहे. पण, बॉयफ्रेंड कॅननचा तिला मारण्याचा हेतू होता का, याबाबत कोणताही पुरावा नाही. कॅननने प्रमाणापेक्षा जास्त ताकद वापरली होती. रात्री गेमनंतर हार्ट अॅटॅक आल्याने जॉर्जियाला रुग्णालयात दाखल केलं होतं. पहाटेच्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आलं.प्रेयसीची प्रकृती बिघडली तेव्हा प्रियकराने तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात नेल्यानंतर चौकशी होण्यापूर्वीच तो फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हत्येचा तपास सुरू करून कॅननचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रुग्णालयाजवळील जंगलात लटकलेल्या अवस्थेत ल्यूक कॅननचा मृतदेह आढळला.
जॉर्जियाच्या कुटुंबीयांनी दावा केला की, तिने 2021 मध्ये कॅननला डेट करायला सुरुवात केली तेव्हा त्याचं वागणं बदललं. तो तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. तर, कॅननच्या भावानं सांगितलं की, त्याला त्याच्या प्रेयसीची खूप काळजी होती. तो तिची फार काळजी घेत असे. या बाबत कोर्टाने निर्णय दिला की, सेक्स गेम दरम्यान ब्रिटिश डान्सरचा ड्रग्जच्या आहारी गेलेल्या प्रियकराने गळा दाबून खून केला. प्रियकरावर कोणतीही कारवाई होण्याआधीच त्याने आत्महत्या केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.