सिद्धू मूसवाला खून प्रकरणाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या करण्यात आली आहे.अमेरिकेच्या एका न्यूज चॅनलकडून हा दावा करण्यात आला आहे.अमेरिकन न्यूज चॅनलच्या रिपोर्टनुसार, गँगस्टर गोल्डी ब्रारची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गँगस्टर सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार याला भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतेच दहशतवादी म्हणून घोषित केले होते. दरम्यान, गँगस्टर गोल्डी ब्रारने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर तो चर्चेत आला.
गँगस्टर गोल्डी ब्रार याचा जन्म ११ एप्रिल १९९४ रोजी शमशेर सिंग आणि प्रीतपाल कौर यांच्या घरी झाला. तो पंजाबच्या श्री मुक्तसर साहिबचा रहिवासी आहे. गोल्डी ब्रारचे वडील पोलिसात नोकरीला होते. गोल्डी ब्रार याच्याविरुद्ध राजकारण्यांना धमकीचे फोन करणे, खंडणीची मागणी करणे आणि अनेक खुनाची जबाबदारी स्वीकारणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत.गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार याची हत्या केल्यानंतर गोल्डीने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.या घटनेनंतर तो अनेक गुंडांच्या संपर्कात येऊ लागला. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे राहणारा गोल्डी ब्रार खलिस्तानी दहशतवादी गट बबजारशी संबंधित होता.
अमेरिकन न्यूज चॅनलने केला दावा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.