Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इन्फ्रा स्ट्रक्चरला प्राधान्य देणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी संजयकाका पाटील यांना मताधिक्य द्या : डॉ. भागवत कराड

इन्फ्रा स्ट्रक्चरला प्राधान्य देणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी संजयकाका पाटील यांना मताधिक्य द्या : डॉ. भागवत कराड


सांगली : देशाची मजबूत बांधणी करण्यासाठी  इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य देणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी संजयकाका पाटील यांना मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.  सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील क्रीडाई भवन मध्ये क्रीडाई आणि बिल्डर्स असोसिएशनच्या (बि आय) पदाधिकाऱ्यांशी डॉ. भागवत कराड यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 


आमदार सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ नेते दीपकबाबा शिंदे‌ म्हैसाळकर , महाराष्ट्र विज महामंडळाच्या संचालक सौ. निता केळकर, क्रीडाईचे राज्य प्रतिनिधी रविंद्र खिलारे, जिल्हाध्यक्ष जयराज सगरे, उपाध्यक्ष सुनील कोकितकर, राजेश गंगावणी, आनंदराव माळी, सचिव दिलीप पाटील, खजिनदार इम्रान मुल्ला, बिल्डर्स असोसिएशनचे स्वप्निल कौलगुड, अमित पेंढूरकर रजीत घासाशी, सुनील माणकापुरे, उत्तम आरगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी अभियंते उपस्थित होते. 

डॉ. भागवत कराड म्हणाले, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य दिले आहे. या माध्यमातून अनेक हजारो कोटींचे महामार्ग, रेल्वेची डेव्हलपमेंट तसेच रस्ते आणि मोठ्या शासकीय आवश्यक इमारती उभारण्याचे काम करण्यात आले आहे. देशाच्या विकासामध्ये बांधकाम व्यवसायिकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक योजना राबवण्यामध्ये मोदी सरकार कधीच मागे पडले नाही. या पुढच्या काळात बांधकाम व्यवसायाशी निगडित असणारे सर्व उद्योग, उत्पादने यामध्ये आवश्यकता सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. 

बांधकाम व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. या देशाची मजबूत बांधणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कष्ट घेत आहेत येणाऱ्या काळात या देशात इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याचा रोड मॅप तयार करण्यात आलेला आहे त्यानुसार कामकाज सुरू आहे. देशाची वाटचाल महासत्तेकडे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना आपण सर्वांनी मताधिक्य देऊन विजयी करावे. संजय काकापाटील यांना दिलेलं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं मत आहे. त्यामुळे संजयकाकांना मतदान करा, असे आवाहन भागवत कराड यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.