Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोण होणार सांगलीचा खासदार? बुलेट आणि युनिकॉर्नची पैज

कोण होणार सांगलीचा खासदार? बुलेट आणि युनिकॉर्नची पैज 


सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत ही यंदा चांगलीच लक्षवेधी ठरली. सांगलीमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झालं. त्यानंतर आता सांगलीचा नवा खासदार कोण होणार? याची चर्चा सांगलीकरांमध्ये रंगत आहे. ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी लागलेली एक पैज सध्या चांगलीच गाजतीय.


सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील दोघांमध्ये एकमेकांना वाहनं देण्याची पैज लागली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले, तर एकाने आपली युनिकॉर्न गाडी देईन अशी पैज लावलीय. तर भाजपा उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देईन अशी पैज लावलीय.
रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असे पैज लावलेल्यांची नावे आहेत. विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. या पैजेसाठी काही जणांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोण ही शर्यत जिंकणार हे येत्या ४ जूनला स्पष्ट होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.