पुणे जिल्ह्यात येणाऱ्या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान संपन्न झाला आहे. उमेदवारांचं भवितव्य 'ईव्हीएम' मशीन मध्ये कैद झाले असून या ईव्हीएम मशीन मतदार संघामध्ये विविध ठिकाणी सुरक्षित रित्या ठेवण्यात आले आहे.
चार जून रोजी ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत .त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.मात्र तत्पूर्वी ईव्हीएम मशीन मध्ये कोणतीही गडबडी होऊ नये यासाठी उमेदवार स्वतःच लक्ष देऊन असून ईव्हीएम ठेवलेल्या परिसरावर त्यांचं बारीक लक्ष आहे.या ठिकाणी उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील तैनात केले असल्याचे देखील बोलले जात आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी तर पुणे शिरूर आणि मावळ या ठिकाणी चौथ्या टप्प्यांमध्ये 13 तारखेला मतदान संपन्न झाले. यानंतर बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क धान्य गोदाम ठेवण्यात आले आहेत. तर शिरुर मतदारसंघातील ईव्हीएम माशीन रांजणगाव एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन या छत्रपती शिवाजी महाराज संकुल बालेवाडी येथे ठेवण्यात आलेले आहेत.या तिन्ही ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आले असून सीसीटीव्ही देखील लावण्यात आले आहेत, तसेच या परिसराला मोठ्या प्रमाणात पोलिस संरक्षण देण्यात आल्याने छावणीचे स्वरुप आले आहे. या तिन्ही ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलीस असा तीन स्तरीय बंदोबस्त 24 तास तैनात करण्यात आला आहे. इतकी सगळी सुरक्षा व्यवस्था असताना देखील ईव्हीएम बाबत अद्यापही उमेदवारांच्या मनामध्ये अजूनही साशंकता आहे. त्यामुळे ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना उमेदवारांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम असलेल्याठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आली होती. 45 मिनिटं सीसीटीव्ही बंद असल्याने यामध्ये काही काळंबेरं आहे, असा संशय ही यावेळी व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पुणे लोकसभेची मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी नेटवर्क जामर लावण्याचे काम लाखो रुपये खर्चून उमेदवाराकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ऑनलाइन स्वरूपात ईव्हीएम मशीनची कुठलीही छेडछाड होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे असं बोललं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.