सांगली जिल्ह्यात विरोधकांचे बार, हॉटेल्सवर कारवाईचे 'टार्गेट'?
सांगली : सांगलीत मतदान काही दिवसांवर आले असताना सत्ताधाऱ्यांकडून् साम, दाम, दंड, भेद या नीतींचा अवलंब केला जात आहे. विरोधकांना मदत करणाऱ्या काही माजी नग्रसेवक, दुसऱ्या फळीतील नेत्यांचे बार आणि हॉटेल्सला टार्गेट करण्यात आल्याचे चित्र आहे. या बार, हॉटेल्सवर कारवाई करण्यासाठी मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच नावे दिल्याची चर्चाही आहे. त्यामुळे येन-केन प्रकारे विरोधकांना टार्गेट करण्याचे सर्व हातखंडे वापरले जात असल्याचीही चर्चा आहे.
सांगलीत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारामध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. तीनही उमेदवारांनी प्रचारात जौरदार आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांनी धुरळा उडवला आहे. शिवाय पदयात्रा, कोपरा सभा, रॅली याद्वारे वातावरण निर्मिती केली जात आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद् या सर्व नीतींचा अवलंब केला जातो अशी म्हण प्रचलित आहे. मात्र सांगलीत त्याचा प्रत्यय येत आहे.
विरोधी उमेदवारांचे समर्थन करणाऱ्या तसेच विरोधी उमेदवारांच्या प्रचारात आघाडीवर असलेल्या माजी नगरसेवक, दुसऱ्या फळीतील नेत्यांना टार्गेट करण्याचे थेट आदेश मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून आल्याची चर्चा आहे. उमेदवारांच्या समर्थकांचे बार आणि हॉटेल्सवर शुक्रवारपासून कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी मुंबईतील संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी थेट नावानिशी टार्गेट दिल्याची चर्चा आहे. शिवाय दिलेल्या यादीप्रमाणे कारवाई होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी आदेश देणारे अधिकारी सांगलीच्या जवळच्याच जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत अशीही चर्चा आहे.
विरोधी उमेदवारांच्या समर्थकाना टार्गेट करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कमर्चाऱ्यांना दिवसाचे चोवीस तास कामाला जुंपल्याचीही चचार् आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने सर्व प्रकारच्या दबाव तंत्रांचा वापर केला जात असल्याचीही चर्चा सांगली जिल्ह्यात रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.