मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आज मुंबईत होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज ठाकरे यांची देखील सभा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रमुख नेत्यांसाठी सभा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टिका केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा सुरू आहे. ज्या पक्षाचा एकही उमेदवार उभा नाही. तो पक्ष गावोगावी, घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. यावरून सुपारी घेण्याचे प्रकार किती उच्च स्तरावर गेला असल्याचे दिसून येतं. असं म्हणत आता नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे. असा टोलाही त्यांनी लगावला.तसेच नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ३० ते ३५ सभा होत आहेत. त्याचा अर्थ येणाऱ्या काळात नरेंद्र मोदींना जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत याच्या प्रचारालाही ते लागतील. पंतप्रधान कुठंपर्यंत गेलं पाहिजे. हेपण महत्वाचं आहे. पण ही ताकद या महाराष्ट्राच्या जनतमध्ये, या मातीत आहे. ही देशाच्या पंतप्रधानाना या रस्त्यावरून मुंबईत पहिल्यांदा सगळे पाहत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.