Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडिलांच कर्ज व उचल माफ करतो म्हणत शालेय विध्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केली! बारामतीत गुन्हा दाखल

वडिलांच कर्ज व उचल माफ करतो म्हणत शालेय विध्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केली! बारामतीत गुन्हा दाखल 


घटना बारामती परिसरातील आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी मळद येथील भय्यावस्ती येथे राहणाऱ्या दत्तात्रय चंद्रकांत कुंभार याच्यावर पोस्को आणि ॲट्रॉसिटीसह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती थोडक्यात अशी, ही घटना 16 मे 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बारामतीच्या कसबाभागातील महालक्ष्मी कॉम्प्युटर्स येथे घडली. यामध्ये फिर्यादी मुलीच्या आई-वडिलांना दिलेले कर्ज व उचल स्वरूपात दिलेले पैसे माफ करतो असे सांगत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.


तिने त्यास नाही, म्हटले असता आरोपी दत्तात्रय चंद्रकांत कुंभार याने तिचे तोंड दाबून त्याचे जवळील चाकूने तिच्या मानेवर वार करून, पोटामध्ये चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला व फिर्यादी मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद या मुलीने दिल्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे पुढील तपास करत आहेत

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.